शेतकऱ्यांसाठी सरकारच्या ‘या’ योजना माहिती आहेत का? प्रक्रिया साधी आणि सोपी, फायदेच जास्त!

shetkari yojana maharashtra 2023 mahiti marathi

 शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत असते. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या अनुदान योजना राबवल्या जात आहे, याची माहती घेऊया. या योजनेच्या माध्यामातून शेतकऱ्यांनी शेती करणं सोपं होत असते. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

शेतीसाठी पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये सुक्ष्म सिंचन योजना राबवली जातेय. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनासाठी अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री कृषी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के अनुदान दिले जाते. तर इतर शेतकऱ्यांसाठी ४५ टक्के अनुदान दिले जाते.

देशातील सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही जातीची अट नाहीये. परंतु जर अर्जदार शेतकरी एससी एसटी जातीचा असेल, तर त्याला जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.


पात्रता

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • शेतजमिनीचा सातबारा प्रमाणपत्र आणि आठ प्रमाणपत्र
  • जर अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असल्यास जातीचा दाखला द्यावा.
  • शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी विद्युत जोडणी असणे आवश्यक
  • वीज बिलाची पावती
  • पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
  • तसेच ज्या शेतकऱ्याने २०१६-१७ च्या आधी या योजनेचा लाभ घेतलेला असेल, तर पुढील 10 वर्ष त्याला त्या सर्वे नंबरसाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

अर्ज कुठे कराल

  • इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.
  • लाभ प्रक्रिया
  • फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्याला सुक्ष्म सिंचन प्रणाली विकत घेण्यासाठी पूर्व मंजुरी मिळेल.
  • या मंजुरीनंतर शेतकरी अधिकृत विक्रेत्याकडून सुक्ष्म सिंचन प्रणाली विकत घेऊन शकतो.
  • या सिंचन प्रणालीच्या पावत्या ३० दिवसाच्या आत ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड कराव्यात.

नमो शेतकरी महा सम्मान निधि योजना

महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे ‘नमो शेतकरी महा सन्मान निधि योजना’ राबवण्यात येतेय. सरकारकडून योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात.
पात्रता
  • या योजनेसाठी इच्छुक शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असवा.
  • या योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकरी अर्ज करू शकतील.
  • शेतकऱ्यांकडे स्वता:च्या नावे शेतजमीन असावी.
  • कृषी विभागात अर्जदाराची शेतकरी म्हणून नोंदणी असावी.
  • शेतकऱ्यांच्या नावे बँकेत खाते असावे. ते बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.

Leave a comment