दिवाळीच्या अभ्यंगस्नानाचे महत्त्व काय? जाणून घ्या मुहूर्त आणि फायदे

diwali abhangya snan

दिवाळीचा पहिला दिवस म्हणून अभ्यंग स्नानाचीही प्रथा आहे. दिवाळी सणातील नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे.

हे नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी केले जाते. तर अभ्यंगस्नान म्हणजे काय ?

दिवाळीच्या पहिल्या दिवशी तेल आणि उटणं का लावले जाते? हे आज आपण जाणून घेऊया

अभ्यंगस्नान हे दिवाळीतल्या चार दिवसांपैकी नरक चतुर्दशीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाला आणि बलिप्रतिपदेला केलं जातं. हे स्नान शक्यतो ब्राम्ह मुहूर्तावर म्हणजेच सकाळी लवकर उठून साडेचार पासून ते सकाळी 7 च्या दरम्यान केले जाते.

या दरम्यानच्या कालावधीमध्ये वातावरणात वात हा जास्त प्रमाणात असतो. आपल्या शरीरात देखील वाताचे प्रमाण जास्त असते.

अशा वेळेस अभ्यंगस्नान केल्याने शरीराला जास्त फायदे होतात.

अभ्यंग स्नान पद्धतशास्त्रानुसार,

नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अंगाला मुलतानी माती लावून स्नान करण्याच्या प्रक्रियेला अभ्यंगस्नान म्हणतात. ज्यामध्ये हळद, दही, तिळाचे तेल, बेसन, चंदन आणि औषधी वनस्पती लावल्या जातात.

या पेस्टने संपूर्ण शरीराची मालिश केली जाते. या उटणामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास देखील मदत होते.

दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे शुभ मुहूर्त

  • वसुबारस – 17 ऑक्टोबर 2025 , शुक्रवार
  • पूजा मुहूर्त 5:14 सकाळी ते 7:43 सायंकाळी
  • गुरु द्वादशी , धनत्रयोदशी, यमदीपदान – 18 ऑक्टोबर 2025, शनिवार
  • नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान, यम तर्पण – 20 ऑक्टोबर 2025 , सोमवार
  • लक्ष्मी-कुबेर पूजन – 21 ऑक्टोबर 2025 , मंगळवार
  • लक्ष्मीपूजन मुहूर्त – 21 ऑक्टोबर 2025 , मंगळवार
  • दुपारी. 3 ते 4:30, सायं. 6 ते 8:40
  • वहीपूजन मुहूर्त – 22 ऑक्टोबर 2025, बुधवार
  • पहाटे 3:20 ते 6:00, सकाळी 11 ते 12:30, सायंकाळी 6:30 ते 8:00
  • यमद्वितीया (भाऊबीज) – 23 ऑक्टोबर 2025 , गुरुवार.

अभ्यंगस्नानाचे फायदे

शरीराची कांती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान आणि पुष्ट व्हावेत यासाठी हे स्नान केले जाते.

आरोग्याची वाढ होणे हा याचा प्रमुख हेतू मानला जातो. अभ्यंगस्नान हे केवळ दिवाळीच्या दिवशी करू नये तर त्या दिवसापासून सुरुवात करून ते वर्षभर रोज करावे असे आयुर्वेदातील तज्ज्ञ सांगतात.

उटणं हे आयुर्वेदिक घटकांपासून बनवले जाते. त्यामुळं त्वचेवर त्याचा काहीच दुष्परिणाम होत नाही. नैसर्गिक घटक असल्यामुळं त्वचेचा पोतही सुधारतो.

अभ्यंगस्नानाच्यावेळी उटणं लावायच्या आधी तिळाच्या तेलाने मॉलिश करावी. कारण तिळाचे तेल हे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते तसंच त्यामुळे त्वचादेखील मऊ राहते.

थंड हवामानामुळं त्वचा कोरडी पडते अशावेळी उटण्याने अंघोळ केल्यास त्वचा मऊ आणि उजळते. गरज असल्यास तुम्ही उटण्यात गुलाबाच्या पाकळ्या, केशर किंवा संत्र्याच्या सालीची पावडरदेखील टाकू शकता.

Leave a comment