खुशखबर! देशभरात GST चे दोन स्लॅब रद्द, काय महाग आणि काय स्वस्त ? जाणून घ्या येथे

Gst new rules september 2026

जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारा अतिशय मोलाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. जीएसटीचे 12 आणि 28 टक्के स्लॅब आता पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत.

काय महाग, काय स्वस्त?

सुखा मेवा, बदाम, काजू, पिस्ता, खजूर, मिक्स मेवा या वस्तूंवर याआधी 12 टक्के जीएसटी लागायची. पण आता या वस्तूंवर केवळ 5 टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांच्या विविध वस्तू, शेतीशी संबंधित वस्तू ज्यांच्यावर आधी 12 टक्के जीएसटी लागायचा तो आता 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच मार्बल, लेदर इत्यादी वस्तूंवरील देखील जीएसटी कमी करण्यात आला आहे.

सिमेंटवर याआधी 28 टक्के जीएसटी आकारला जायचा. पण आता 18 टक्के जीएसटी लावला जाईल.

आरोग्याशी संबंधित उपकरणे आणि 33 औषधांवर आता जीएसटी लागणार नाही.

लक्झरी वस्तू जसे की कार, बाईक आणखी महाग होतील. यावर एक विशेष स्लॅब लावला जाईल. याशिवाय तंबाखू, पान मसाला, फ्लेवर, फ्रूट ड्रिंक आणि इतर पॅकेज्ड पेये महाग होतील. 350 सीसी पेक्षा जास्त इंजिन असलेल्या बाईक महाग होतील

Leave a comment