‘आधारकार्ड’ नाही तर जन्मदाखला महत्त्वाचा पुरावा; 1 ऑक्टोबरपासून लागू होणारा नियम समजून घ्या

birth certificate to be single document for aadhaar

 Birth Death Registration :

1 ऑक्टोबरपासून महत्त्वाच्या कागदपत्र पडताळणीमध्ये जन्म दाखल्याचे महत्त्व वाढणार आहे. नवीन नियमानुसार जन्म प्रमाणपत्राचा वापर शाळा प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, विवाह नोंदणी, सरकारी नोकरी, पासपोर्ट आणि आधारसह अनेक ठिकाणी एकच कागदपत्र म्हणून केला जाऊ शकतो.


पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात जन्म आणि मृत्यूची नोंदणी (सुधारणा)या विधेयक २०२३ मंजूर करण्यात आला आहे. त्याला राष्ट्रपतींची संमती मिळाली असून त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून होणार आहे.

नवीन कायद्यामुळे नोंदणीकृत जन्म आणि मृत्यूचा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय डेटा बेस तयार करण्यास मदत होईल. याद्वारे इतर सरकारी कामे सहज व सोपी होती. हा नवा नियम १ ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतरच्या जन्म प्रमाणपत्रांना लागू होणार आहे.

1. नियम (Rules) बदल्यानंतर फायदा कसा होईल?

जन्म-मृत्यू नोंदणीच्या नियमांमध्ये बदल करण्यामागील उद्देश असा की, केंद्र आणि राज्य स्तरावर जन्म-मृत्यूचा (Birth Certificate) डेटाबेस तयार करणे. हा नियम लागू झाल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार जन्म आणि मृत्यूची आकडेवारी सहज एकमेकांना पाठवू शकतील.

यासाठी राज्यांकडून मुख्य निबंधक नियक्त केले जातील. तसेच यांचे काम असेल मिळालेला डेटा योग्य प्रकारे जतन करणे. मोठ्या स्तरावरील हे काम कुलसचिवांमार्फत केले जाईल. यामुळे जन्म आणि मृत्यूंचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यात मदत होईल आणि रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र यांसारखे अनेक डेटा बेस तयार करणे सोपे होईल.

जन्म-मृत्यूचा दाखला आधार कार्डप्रमाणेच वापरला जाईल का?

आतापर्यंत सगळ्याच महत्त्वाच्या कामांना आधार कार्ड (Aadhar card) वापरले जायचे. तसेच आधार कार्ड बँका आणि इतर महत्त्वाच्या बाबींना खात्यांशी लिंक करणे आवश्यक आहे. परंतु, आता जन्म-मृत्यू प्रमाणपत्र कार्य करेल. जे जन्म आणि मृत्यूच्या पुराव्यासाठी सर्वत्र स्वीकारले जाणारे ओळखपत्र म्हणून काम करेल.

Leave a comment