रेल्वे बोर्डचा महत्त्वाचा निर्णय! अपघात झाल्यास १० पटीने मिळणार रक्कम, कोणाला मिळणार नुकसान भरपाई

 

Indian Railway Big Decision

Indian Railway Big Decision :

अनेकांच्या धावपळीच्या जीवनाची सुरुवात होते ती रेल्वेने. खिशाला परवडणारी आणि सहज सोपी वाहतुक. लाखो लोकांच्या कामाची सुरुवात ही रेल्वेने होते. अनेकदा प्रवास सुकर आणि लगेच व्हावा यासाठी आपण रेल्वेने प्रवास करतो.

गावी जाताना किंवा लांबचा पल्ला गाठताना आपण भारतीय रेल्वेने प्रवास करतो. बरेचदा प्रवास करताना रेल्वेचा अपघात होतो. अशावेळी जर आपण अपघाती विमा (accident insurance) काढला असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो. भारतीय रेल्वेच्या अधिनियमानुसार रेल्वे बोर्डाने रेल्वे अपघातात मृत्यू किंवा जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये 10 पटीने वाढ करण्यात निर्णय घेतला आहे.

२०१२ आणि २०१३ मध्ये या रकमेत (Money) सुधारणा करण्यात आली होती. अशातच रेल्वे बोर्डाने अपघात मृत्य झालेल्या आणि प्रवासात (Travel) जखमी झालेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १८ सप्टेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, अशातच रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांनाही सवलत देण्यात आली आहे.

1. रेल्वे अपघातात किती रक्कम मिळेल?

रेल्वे (Railway) बोर्डाच्या परिपत्रकानुसार, रेल्वे आणि मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंग अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये, तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर किरकोळ दुखापत झालेल्या व्यक्तीला ५० हजार रुपयांची रक्कम दिली जाईल. याआधी ही रक्कम ५०,०००, २५,००० आणि ५,००० रुपये इतके होती.


2. रक्कम वेगवेगळी मिळणार

रेल्वेच्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, कोणत्याही घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्यांना दीड लाख, ५०००० आणि ५००० रुपये दिले जातील.

3. हॉस्पिटलचा खर्च (hospital billing)

रेल्वे अपघातांत ३० दिवसांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल झालेल्या किंवा गंभीर परिस्थिती असलेल्या जखमी प्रवाशांना अतिरिक्त मदत केली जाईल. तसेच याच प्रत्येत १० दिवसांच्या कालावधीतच्या शेवटच्या तारखेला किंवा सुट्टीच्या दिवशी प्रतिदिन ३००० रुपये दिले जातील. गंभीर दुखापत झाल्यास, सहा महिन्यांसाठी दररोज 1,500 रुपये दिले जातील.

4. या लोकांना मिळणार नाही रक्कम

बोर्डाने सांगितले की, रेल्वे क्रॉस करताना झालेला अपघात, अतिक्रमण किंवा विजेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू झालेल्या लोकांना कोणतीही रक्कम मिळणार नाही.

Leave a comment