रोज रात्री पाय दुखतात, पोटऱ्या ठणकतात, पायात गोळे येतात? ‘ठणका’ का बसतो, वाचा कारणे..

hata-payat-mungya-ka-yetat

 रात्री झोपल्यावर किंवा सकाळी उठताना कोणीतरी पाय दाबून द्यावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दिवसभर ज्या पायांच्या जोरावर आपण सगळीकडे धावत असतो आणि वेगवेगळी कामे करत असतो त्या पायांनी आपल्याला योग्य ती साथ देणे बंद केले तर? कल्पनाही करवत नाही. 

पण पाय दुखण्याची तक्रार लहान वाटत असली तरी अनेकांना याचा सामना करावा लागतो. प्रामुख्याने बैठ्या जीवनशैलीमुळे पायांना हालचाल नसणे, कमी पाणी पिणे, लठ्ठपणा, अपुरी झोप, पोषक आहार न घेणे, चुकीची पादत्राणे ही कारणे असू शकतात.

 

कधी सतत मुंग्या येतात तर कधी पायांवर सूज येते. पण दुखणाऱ्या पायांवर वेळीच उपाय न केल्यास ही समस्या वाढत जाते. मग दैनंदिन व्यवहारांवरही त्याचा परिणाम दिसू लागतो. तेव्हा या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी वेळीच उपाययोजना केलेल्या बऱ्या. पाहूयात पायदुखी कमी होण्यासाठी करता येतील असे सोपे उपाय..

हे 8 असू शकतात कारणे

१.बराच काळ खुर्चीत बसून काम केल्याने कालांतराने पाय दुखायला लागतात. अशावेळी बसलेल्या जागीच पाय सरळ करुन स्ट्रेच करावेत यामुळे थकवा दूर होतो आणि काही वेळाकरता आराम मिळतो.

२.आपण दररोज वापरत असलेली चप्पल, बूट, सँडल यांचाही पायावर परिणाम होत असतो. ही पादत्राणे योग्य नसतील तर त्यामुळेही पायदुखीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पादत्राणे खरेदी करताना आपल्या सोयीनुसार, चांगल्या दर्जाची पादत्राणे घ्यावीत. तसेच तुम्हाला सतत हाय हिल्स वापरायची सवय असेल तरीही पाय दुखू शकतात.


३.अनेकदा थंडी असलेल्या ठिकाणी गारठ्यामुळेही पाय दुखण्याचा त्रास (leg pain) होऊ शकतो. हल्ली घरातील फरशी ही टाइल्ससारखी टणक असते. सतत या फरशीवर उभे राहिल्यास महिलांच्या टाचा आणि पाऊले दुखू शकतात. अशावेळी घरातही स्लिपरचा नियमित वापर करावा. 

४.सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना पायाचे काही किमान व्यायाम केल्यास पायदुखीची समस्या निश्चित कमी होऊ शकते. या व्यायामांमुळे पायातील ताणलेल्या शिरा मोकळ्या होण्यास मदत होते.

 

५.शरीराचा रक्तप्रवाह सतत खालच्या दिशेने होत असतो, त्यामुळे मुद्दाम झोपताना किंवा बसतााना पाय उशीवर थोडे वरच्या दिशेने ठेवल्यास त्याचाही पायदुखी कमी होण्यास फायदा होऊ शकतो. 

६.शक्य तेव्हा पायांना तेलाने मालिश करणे हा पायदुखी कमी होण्यासाठीचा आणखी एक उपाय आहे. यामध्ये पायाचे तळवे, टाचा, बोटे, पोटऱ्या, गुडघे यांना मालिश करावे. त्यामुळे शिरा मोकळ्या होऊन आराम मिळू शकतो. 

७.पाय जास्तच दुखत असतील तर गरम पाण्यात घालून २० ते २५ मिनिटे बसावे. या पाण्यात मीठ टाकल्यास आणखी चांगले. यामुळे दुखणारे पाय मोकळे होण्यास मदत होते.

 

८. लठ्ठपणा (obesity) हेही पाय दुखण्याचे आणखी एक कारण असते. त्यामुळे ज्यांचे पाय दिर्घकाळ दुखतात त्यांनी वजन कमी करण्यावर (weight loss) भर द्यावा. लठ्ठ व्यक्तींचे वजन त्यांच्या गुडघ्यांवर येते, त्यामुळे त्यांचे गुडघेही दुखतात. तसेच पावलांवरही ताण येऊ शकतो. अशांनी वजन नियंत्रणात राहील याची काळजी घ्यावी.

९.आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे व शरीरासाठी आवश्यक असणारे इतर घटक योग्य प्रमाणात नसतील तरीही पायदुखीसारखी समस्या भेडसावू शकते. त्यामुळे योग्य तो संतुलित आहार घेण्यावर भर ठेवा.

१०.याशिवाय हाडांच्या काही समस्यांमुळेही पाय दुखू शकतात. हे दुखणे जास्त असेल तर मात्र वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. 

Leave a comment