PM मोदींच्या वाढदिवशी 35 कोटी लोकांना मिळणार गिफ्ट! सुरु होणार जबरदस्त योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

Ayushman Bhav Scheme Launch

Ayushman Bhav Scheme Launch :

१७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचा ७३ वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. अशातच वाढदिवसानिमित्त भारतातील कोट्यवधी लोकांना फायदा होणार आहे.

मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक नवीन सुख सुविधा आणि योजनाचा लॉन्च करत असतात. अशातच १७ सप्टेंबर रोजी आयुष्मान भव योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेद्वारे सर्वसामान्यांना आरोग्यविषयक समस्यांची माहिती मिळेल तसेच शासकीय योजना काय आहेत. त्यांचा लाभ कशाप्रकारे घेता येईल याविषयी संपूर्ण माहीती मिळेल. सरकार आणि आरोग्य मंत्रालयाच्या या मोहिमेद्वारे आयुष्मान भारत योजनेचा लाभ ३५ कोटी लोकांपर्यंत पोहोचणार आहे.

1. 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत

आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून आम्ही आयुष्मान भव कार्यक्रम राबवणार आहोत. 17 सप्टेंबरला ही मोहीम सुरू केली जाणार आहे, असे मांडविया यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी 60 कोटी देशवासीयांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफतमध्ये उपचार देतील. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत त्यांनी महिला, आणि शोषित समाजासाठी काम केले. त्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.

देशभरातील लोकांना लाभ (Benefits)

केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना (Scheme) ही एक प्रमुख योजना आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून त्याची अंमलबजावणी केली जाते. याद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार आहे. आरोग्य मंत्री म्हणाले- या मोहिमेअंतर्गत आम्हाला आरोग्य सेवांना अधिक प्रोत्साहन देता येईल. तसेच आरोग्याशी संबंधित योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचाही आम्ही प्रयत्न करू. जेणेकरून भारत सरकारच्या योजना प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतील.


आयुष्मान भव योजना काय आहे?

आयुष्मान भव योजनेचा (Ayushman Bhav Scheme ) उद्देश फक्त लोकांपर्यंत ही योजना पोहचवणे नाही तर त्यांतून आरोग्यबाबत माहीती देणे आहे. या योजनेतून

आयुष्मान भव मोहिमेचा उद्देश केवळ आयुष्मान भारत योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवणे हा नाही. त्यापेक्षा आरोग्य मंत्रालयाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवायला हव्यात. याला तीन विभागात विभागले आहे.

आयुष्मान मेळा:

देशभरातील लाखो आरोग्य आणि कल्याण केंद्रांवर आयुष्मान मेळा आयोजित केला जाईल. या मेळ्यांमध्ये लोकांना आरोग्यविषयक माहिती आणि सेवा पुरविल्या जातील.

आयुष्मान कार्ड वितरणाच्या प्रक्रियेला गती देणे:

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना आयुष्मान कार्ड दिले जातात. या योजनेतून आयुष्मान कार्ड वितरणाची प्रक्रिया अधिक वेगवान केली जाणार आहे.

आयुष्मान सभा:

गावात आणि खेड्यापाड्यात आयुष्मान सभा आयोजित केली जाईल. तसेच यामध्ये आरोग्याविषयक जनजागृती ही केली जाईल.

2 thoughts on “PM मोदींच्या वाढदिवशी 35 कोटी लोकांना मिळणार गिफ्ट! सुरु होणार जबरदस्त योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती”

Leave a comment