vima sakhi yojana 2025
गुंतवणुकीसाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. विविध बँका, पोस्ट ऑफिस यांच्या योजना आहे. अशातच महिलांसाठी एलआयसीची एक योजना अत्यंत फायद्याची ठरत आहे. विमा सखी योजना असं या योजनेचं नाव आहे.
काय आहे LIC विमा सखी योजना?
या योजनेअंतर्गत देशातील महिलांना तीन वर्षांसाठी एलआयसी एजंट बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान महिलांना स्टायपेंडही दिला जातो.
प्रशिक्षणादरम्यान पहिल्या वर्षी महिलांना दरमहा 7 हजार रुपये मानधन दिले जाते. दुसऱ्या वर्षी दरमहा 6000 रुपये स्टायपेंड दिला जातो.
तर तिसऱ्या वर्षी दरमहा 5000 रुपये स्टायपेंड दिला जातो. याशिवाय चांगल्या कामगिरीसाठी कमिशनही दिले जाणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना एलआयसी एजंट बनण्याची संधीही दिली जाते.
LIC विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय?
18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही महिला LIC विमा सखी योजनेसाठी अर्ज करू शकते.
यासाठी महिलांनाही 10 उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. योजनेसाठी एलआयसीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येतो.
गेल्या महिन्यात 9 डिसेंबर 2024 रोजी, LIC ने देशातील महिलांसाठी विमा सखी योजना सुरू केली होती.
1 महिन्याच्या आत LIC च्या विमा सखी या योजनेसाठी 52511 महिलांनी अर्ज केले आहेत. त्यांना दरमहा 7000 रुपये मिळणार आहेत. अर्ज केलेल्या महिलांपैकी 27695 विमा सखींना पॉलिसी विकण्यासाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. तर 14583 विमा सखींनी पॉलिसी विकण्यास सुरुवात केली आहे.