30 दिवसांपेक्षा जास्त सुट्ट्या पेंडिंग असतील तर कंपनीला द्यावे लागतील पैसे; कसे? जाणून घ्या सविस्तर

 

law-for-exceeded-leave-in-office-in-india

Law for Exceeded Leave: हल्ली प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या कामागारांना किंवा कर्मचाऱ्यांना कामासोबत सुट्ट्या देखील मिळतात. परंतु, सध्या नव्या कामगाराच्या कायद्याची वाट संपूर्ण देश पाहात आहे.

अशातच कर्मचारी आणि मालक यांच्यासाठी नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये टेक होम सॅलरी, EPF खात्यात योगदान तसेच आठवड्यात किती तास काम करायचे, वर्षभरात मिळाऱ्या पेड लीव. या ४ पैकी कोणत्याही एका कर्मचाऱ्यांना सुट्टीची गाइडलाइन देण्यात येते.

कोणत्याही कर्मचाऱ्यांना (Employee) वर्षभरात ३० सुट्ट्या मिळतात. जर एखादा कर्मचारी वर्षभरापेक्षा जास्त महिने काम करत असेल आणि त्यांच्या ३० पेक्षा जास्त रजा बाकी असतील तर कंपनीला (Company) त्याची भरपाई द्यावी लागेल. यामध्ये भरपाईमध्ये मॅनेजर किंवा सुपरवाइजर हस्तक्षेप करु शकणार नाही.


यामध्ये व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य (Health) आणि कार्य परिस्थिती संहिता, वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता आणि सामाजिक सुरक्षा संहिता हे चार कायद्याच्या अधिसूचनेच्या प्रतीक्षेत आहेत. संसदेने चार नवीन कामगार कायद्याना परवानगी दिली असून सरकारने अधिसूचित केले आहेत.

1. रजा न घेतल्यास इनकॅश किती असू शकते

एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाच्या अटी संहिता, 2020 च्या कलम 32 मध्ये वार्षिक रजा घेणे, पुढे नेणे आणि एनकॅशमेंट यासंबंधी अनेक अटी आणि शर्ती आहेत. कलम 32 (vii) कर्मचाऱ्याला पुढील वर्षात जास्तीत जास्त 30 दिवसांपर्यंत वार्षिक रजा पुढे नेण्याची परवानगी देते. कॅलेंडर वर्षाच्या शेवटी वार्षिक रजा शिल्लक 30 पेक्षा जास्त असल्यास, कर्मचारी त्या थांबवू शकतात आणि उरलेल्या 30 सुट्ट्या पुढच्या वर्षीत फॉरवर्ड करु शकतात. नवीन नियम लागू झाल्यानंतर विनावापर रजा रद्द करण्याची पद्धत बंद करण्यात येईल.

2. तुम्ही रजा रोखून कधी मिळवू शकता?

व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाच्या परिस्थिती संहिता, 2020 नुसार, जर रजेची शिल्लक 30 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर कर्मचारी अतिरिक्त रजा रोखू शकते. असे EY इंडियाचे पीपल अॅडव्हायझरी सर्व्हिसेसचे भागीदार पुनीत गुप्ता म्हणतात. ही रजा प्रत्येक वर्षाच्या शेवटी दिली जाईल. कामगार संहितेनुसार कामगारांसाठी वार्षिक रजा मिळू शकत नाही. यासाठी ती फॉरवर्ड करावी लागेल. सध्या अनेक संस्था वार्षिक आधारावर रजा रोखीकरणाला परवानगी देत ​​नाहीत. वार्षिक आधारावर रजा रोखीकरणाचा नियोक्त्यावर आर्थिक परिणाम होईल.

3. रजा रोखीकरणाची गणना

एकदा सरकारने ओएसएच कोड लागू केल्यानंतर, मर्यादेपेक्षा जास्त रजा रोखणे बंधनकारक असेल. कर्मचाऱ्याला किती पगार मिळणार हा पुढचा प्रश्न आहे. रजा रोखीकरण मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या आधारावर केले जाईल किंवा विशेष भत्ता, घरभाडे भत्ता यासारखे इतर भत्ते देखील विचारात घेतले जाते.

Leave a comment