LIC ची जबरदस्त स्कीम! एकदाच पैसे भरा अन् मरेपर्यंत पेन्शन मिळवा

 

jeevan shanti yojana lic in marathi

LIC New Jeevan Shanti Scheme (LIC Pension Plan)

देशात सर्वांत मोठी LIC ही विमा कंपनी आहे. या कंपनीत प्रत्येक वयोगटातील व्यक्तीच्या आयुष्याचा विचार करत गुंतवणूक केली जाते. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकासाठी इथे अनोख्या स्कीम देण्याता आल्यात. अनेकदा वृद्धपकाळात पैशांची समस्या उद्भवते. अनेक वृद्ध व्यक्तींना उद्भवणारी पैशांची चणचण पाहता LIC ने पेन्शनसाठी एलआयसी नवीन जीवन शांती योजना सुरू केली आहे. या योजनेत फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते.


 

योजनेची वैशिष्ट्ये काय?

एलआयसीच्या नवीन जीवन शांती योजनेमुळे वयोवृ्द्ध व्यक्तींना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी दरमहा पैसे मिळणार आहेत. या योजनेत गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा देण्यात आलेली नाही. इथे तुम्हाला दर महा गुंतवणूक करण्याची आवश्यकताही नाही. तुम्ही फक्त एकदाच पैसे भरून दरमहा या योजनेचा लाभ घेऊ शकता. एकावेळी कमीतकमी गुंतवणूकीची (investment) रक्कम १.५ लाख रुपये इतकी आहे.

या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला हवा तसा कालावधी तुम्ही निश्चित करत परतावा मिळवू शकता. दरमहा, तीन महिने किंवा सहा महिने असा कालावधी तुम्ही निवडू शकता. या योजनेनुसार वृद्ध व्यक्तीला मरेपर्यंत पैसे दिले जातात. जर काही कारणास्तव वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला तर कागदपत्रांमधील नमुद नॉमिनीला त्यांनी जमा केलेली रक्कम दिली जाते.

उदाहरणाद्वारे समजून घेऊ

जर तुम्ही या योजनेत १.५ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पेश्नन १,००० मिळेल. सिंगल लाइफसाठी डिफर्ड अॅन्युइटीमध्ये तुम्ही एकाचवेळी १० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा ११,१९२ रुपये परतावा मिळत राहिल. हा परतावा तुम्हाला सेवानिवृत्त झाल्यापासून अगदी मरेपर्यंत दिला जाणार आहे.

1 thought on “LIC ची जबरदस्त स्कीम! एकदाच पैसे भरा अन् मरेपर्यंत पेन्शन मिळवा”

Leave a comment