भारी नाही तर जबरदस्त आहे ‘ही’ योजना, दररोज 7 रुपये जमा करून आयुष्यभर मिळेल 5000 रुपये पेन्शन

old age pension scheme in maharashtra

APY Pension Scheme:

आपले म्हातारपण कोणत्याही आर्थिक समस्यांशिवाय आरामात पार पडावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेक लोक आपल्या कमाईतून बचतही करतात. वृद्धापकाळात आर्थिक आधारासाठी पेन्शन (old age pension) खूप महत्वाची आहे. मात्र जेव्हा तुम्ही बचत केलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवतात (investment), तेव्हाच तुम्हाला योग्य परतावाही मिळतो.

जेव्हा शरीर तुम्हाला साथ देत नाही आणि तुम्हाला आवश्यक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते, तेव्हा पेन्शन (pension) तुमच्या सर्व समस्यांवर उपाय ठरू शकते. जर तुम्ही तरुण असाल तर दर महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करून तुम्ही तुमचे वृद्धापकाळ आर्थिकदृष्ट्या संपन्न करू शकता आणि तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.


एपीवाय (APY) योजनेतील गुंतवणुकीवर मिळणार पेन्शन

अटल पेन्शन योजनेमुळे तुम्हाला वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळू शकतो. ही एक पेन्शन योजना असून सरकार स्वतः पेन्शनची (pension) हमी देते. तुम्ही या योजनेत दररोज थोडी बचत करून गुंतवणूक करू शकता आणि तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून तुम्हाला 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. या योजनेत गुंतवणुकीची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

अशा प्रकारे तुम्हाला दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळेल

या योजनेअंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी किमान २० वर्षे गुंतवणूक (investment) करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही 40 वर्षांचे असाल आणि तरीही त्यात गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर तुम्ही ६० वर्षांचे झाल्यावर तुम्हाला पेन्शन मिळू लागेल. पेन्शनची गणना समजून घेण्यासाठी, समजा तुमचे वय १८ वर्षे आहे, तर या योजनेत दरमहा २१० रुपये जमा करून, म्हणजे फक्त ७ रुपये प्रतिदिन, तुम्हाला ६० नंतर दरमहा ५००० रुपये पेन्शन मिळू शकते. जर तुम्हाला 1,००० रुपये पेन्शन हवी असेल तर या वयात तुम्हाला दरमहा फक्त ४२ रुपये जमा करावे लागतील.

दरम्यान, अटल पेन्शन योजनेत सामील होऊन, पती-पत्नी दोघेही दरमहा १०,००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता. तसेच जर पतीचा ६० वर्षापूर्वी मृत्यू झाला तर पत्नीला पेन्शनची सुविधा मिळेल. पती आणि पत्नी दोघांच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला संपूर्ण पैसे परत मिळतील. अटल पेन्शन योजना ही सेवानिवृत्ती योजना म्हणून खूप लोकप्रिय आहे.

Leave a comment